ठाणे – पालघरमध्ये व्हॉट्सऍप स्टोरीवरून दोन कुटुंबीयांमध्ये भांडणे झाली. या भांडणात झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पालघरच्या बोईसरमध्ये एका तरुणीने व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवले होते. या स्टोरीवरून शेजारी राहणाऱ्या तरुणाचे या तरुणीशी वाद झाले. हा वाद घरापर्यंत पोहोचला. तेव्हा तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणीला आणि तिच्या आईला जबर मारहाण केली.
या मारहाणीत तरुणीची आई लीलावती या गंभीर जखमी झाल्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करत आहेत. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.