तापसीने शेअर केली शानदार रेसिपी

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने वर्कआऊटनंतर येत असलेला थकवा घालविण्यासाठीची एक शानदार रेसिपी शेअर केली आहे. तापसीने इंस्टाग्राम स्टोरीवर हायप्रोटीन हायफायबर ड्रिंकची रेसिपी चाहत्यांशी शेअर केली आहे. सोशल मीडियावर ही रेसिपी सध्या खूपच व्हायरल होत आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)


तापसीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “सत्तू बरोबर ताक, मेथीच्या बियांची पावडर. लाइव्ह बॅक्‍टीरिया, प्रीबायोटिक्‍स, हेल्दी फॅट यांचे उत्तम संयोजन, जे वर्कआउटनंतरची थकवा दूर करते.’ दरम्यान, अलीकडेच तापसीने एक ड्रिंकची रेसिपी शेअर केली होती. जी शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते. तापसीने या ड्रिंकला “एक्‍झिक्‍युटिव्ह सनसेट ड्रिंक’ असे नाव दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

त्यांनी लिहिले की, “माझे “एक्‍झिक्‍युटिव्ह सनसेट ड्रिंक. जेव्हा मुनमुन माझ्या जेवणाची योजना बनविते तेव्हा मेन्यूमध्ये कोणतेही पदार्थ सामान्य असू शकत नाही. या चरबीयुक्‍त बर्न पॉवरहाऊस पेयामध्ये कच्चा अनफिल्टर्ड सफरचंद सायडर व्हिनेगर असतो. यात मेथी, हळद आणि आले देखील असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)


‘ गोळ्यांऐवजी हळद आणि आले हे आराराविरुद्ध लढायला खूप प्रभावी आहेत. ते माझ्या कामामुळे झालेल्या स्नायूंच्या वेदना आणि सूज दूर करतात. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तापसी “रश्‍मी रॉकेट’मध्ये झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे “शाबाश मिट्ठू’ आणि “हसीन दिलरुबा’ आदी चित्रपट आहेत. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.