नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. संवत्सर दिनदर्शिकेनुसार, दिवाळी हीच नवीन वर्षाची सुरुवात असते किंवा संवत्सर 2077 ची सुरुवात असते. या किंवा त्या मार्गाने, आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने ही सुरुवात महत्त्वाची असते. त्यातच सध्याच्या परिस्थितीत तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. या नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीच्या पाच मार्गांबद्दल माहिती.
बजेटचे नियोजन करण्याला प्राधान्य द्या : स्प्रेडशीटची पद्धत काहीशी संकुचितपणाची वाटू शकते, मात्र अर्थव्यवस्थापनात चतुर असलेले लोक ही पद्धत अवलंबतात. गुंतवणूक करताना किंवा इतर गोष्टींसाठी पैसे शिल्लक ठेवण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते. विशिष्ट मापदंडानुसार काही गोष्टी ठरवणे, त्या चौकटीत टिकून राहणे, हे वैयक्तिक आर्थिक नियोजनातील खर्च व बचत या दुहेरी घटकांतील संतुलन मिळवून देते. थोडक्यात, बजेटनुसार काम केल्याने तुमचे पुढील नियोजन कसे असेल, ते तुम्हालाच ठरवता येईल. एकूणच, बजेट निश्चित करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही हिशेबशीर निर्णय घ्याल आणि संयमित मार्गाने चालाल.
अनिश्चित घटनांसाठी इमर्जन्सी फंड तयार करा : 2020 हे वर्ष जगभरात प्रत्येकासाठी प्रचंड उलाढालीचे ठरले. नव्या वर्षात ही संकटे कदाचित दूर होतील किंवा नाही होणार. यासाठी आपण काही करू शकणार नाहीत. पण आगामी वर्षात गोष्टी अधिक चांगल्या घडतील, अशी आशा करू शकतो. या काळात, इमर्जन्सी फंड हा कोणत्याही धोरणातील प्रथमबिंदू असला पाहिजे. अशा स्थितीला तोंड देताना नेहमीच अडचणी येतात. त्यामुळेच आधीच तयारी करून ठेवण्याचा दृष्टिकोन ठेवल्याने अशा अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होईल. त्यामुळेच आधीच तयारी करून ठेवण्याचा दृष्टिकोन ठेवल्याने अशा अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होईल. अशा वेळी, स्वत:साठी गुंतवणूक करणे, तुमच्यासमोर भविष्यात उभ्या राहणाऱ्या अडथळ्यांच्या दृष्टीने कधीही उउपयुक्तच ठरणार आहे.
तुम्ही ट्रेडिंग करत नसाल तर ते शिकून घ्या. तुम्ही शेअरबाजारात आधीच गुंतवणूक करत असाल तर, पायथॉन किंवा आर या क्रॅश कोर्ससाठी प्रवेश घ्या. तसेच अल्गो-ट्रेडिंग यासारख्या नवनवीन संकल्पनांबद्दल सखोल माहिती मिळवा. प्रोग्रामिंगच्या ज्ञानासह किंवा ज्ञानाशिवाय अल्गो-ट्रेडिंग धोरण कसे आखतात, हे समजून घ्या. अनेकदा व्यवहाराबाबत अतिशय कमी माहीती असताना काही जण या व्यवहारात उतरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
तुमच्यासोबत अखेरपर्यंत राहतील, अशा मालमत्तांमध्ये पैसे गुंतवा : 2020 हे वर्ष चांगल्यासाठीच बदलले आहे. या काळातून काही संकेत मिळाले तर साथीनंतरचे जीवन पूर्वीसारखे कधीच नसेल. कदाचित नोकऱ्यांची स्थिती वेगळी असेल, कारण अनेक पैलू बदलले आहेत. यातील काही स्थिती तशीच राहिल तर काहींमुळे भविष्य आकारास येईल, नोकऱ्या आणि गुंतवणुकीचे स्वरूपही बदलेल. अशा वेळी, स्वत:साठी गुंतवणूक करणे, तुमच्यासमोर भविष्यात उभ्या राहणाऱ्या अडथळ्यांच्या दृष्टीने कधीही उपयुक्तच ठरणार आहे.
तुमचा पैसा गुंतवा आणि दीर्घकालीन ध्येय गाठा : अनेकांसाठी गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करणे होय. पण यापेक्षाही गुंतवणुकीद्वारे बरेच काही साध्य करता येते. यामुळे आपण प्रेरणादायी, आशादायी बनतो व भविष्य सुरक्षित राहते. गुंतवणुकीमुळे आपली मालमत्ता अनेक पटींनी वाढते तसेच आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात.तुम्ही बचत केलेले पैसे मोठ्या रकमेत वाढणार नाहीत. पण तुम्ही गुंतवणूक केलेल्या भांडवलात निश्चित बदल दिसेल. म्हणूनच, आयुष्याच्या सुरुवातीलाच, स्मार्ट गुंतवणुकीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी एक उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो व तुम्हाला हवी तेव्हा आर्थिक मदत मिळते. गुंतवणूकीविषयक सर्वसमावेशक विचार केला तर आपल्याला पैसा, अर्थव्यवस्था उद्योगांचे स्वरूप याची माहीती होते. त्यानंतर मात्र परिस्थिती कशीही असली तरी त्यातून गुंतवणूकीचे सहज मार्ग उपलब्ध हाते असतात.
आता आणि लगेच कृती करा : एका क्षणासाठीही असे समजू नका की गोष्टी जशा आहेत तशाच घडतील. कारण पुढील आर्थिक वर्ष सध्यापेक्षा खूप वेगळे असू शकते. आर्थिक शिस्तीसारख्या गोष्टी आपोआपच घडत नसतात. तुम्हाला त्या जाणीवपूर्वक घडवून आणाव्या लागू शकतात. ज्या क्षेत्रात अधिक सुधारणेची गरज असते, तिथे सजगतेने मेहनत घ्यावी लागेल. सुरुवात करणाऱ्यांनी दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. आपला खर्च आणि बचत करण्याची सवय. आपल्या खर्चाचे मूल्यांकन करा आणि अनावश्यक तसेच टाळण्यासारख्या गोष्टींना दूर सारा. किराणा सामान, मनोरंजन, गॅस आणि अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये बचत करायला सुरुवात करा.
मॉर्टेज, भाड्याची बिले तसेच उपयुक्त गोष्टींवरील खर्च कपात करता येत नाही. तरीही तुमचे मासिक क्रेडिट आणि बॅंकिंग स्टेटमेंट सतत तपासून पाहत, त्यानुसार कृती करा. यामुळे तुम्ही कुठे खर्च करत आहात आणि कुठे कपात करू शकता, याचे स्पष्ट चित्र दिसेल. अनावश्यक खर्च कमी केला तो पैसा उत्पादक गुंतवणूकीसाठी उपलब्ध होत असतो.
तर तात्पर्य असे की, आपल्याला आर्थिक गोष्टींचे पुन्हा विश्लेषण करावे लागेल. आपला बजेटचा प्लॅन योग्य पद्धतीने आखावा लागेल, क्रेडिटवर बारकाईने लक्ष द्यावे लागेल आणि यानंतर योग्य कृती करावी लागेल. त्यामुळे 2021 हे नवे वर्ष किंवा 2077 हे संवत्सर आपल्या अपेक्षेनुसार सुखकर होण्यास मदत होईल.
– जयकिशन परमार.