वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकाला शिवीगाळ करत दमदाटी
पारनेर / टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुक्यात वाळू तस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाला दमबाजी व शिवगाळ करून सरकारी वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पारनेर पोलिसांत तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
ढवळपुरी (ता. पारनेर) येथे सोमवारी (दि.25) रोजी रात्री ढवळपुरी परिसरातील भोंडवेवस्तीनजीक अवैध वाळू उपसा सुरू होता. अवैध वाळू उपसा करणाऱ्या डंपरचा महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग केला. यावेळी वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनावरच डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच महसूलच्या पथकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. पथकात तहसीलदार ज्योती देवरे यांसह कर्मचारी सचिन पोटे, लक्ष्मण बेरड, परमेश्वर राजुरे, अमोल मंडलीक, शशिकांत दोरे यांचा सामावेश होता. याप्रकरणी भाळवणी येथील तीन वाळू तस्करांवर तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्याचे (पान 2 वर)अवैध वाळू वाहतूक करणारे हे आमच्या बंगल्यावर व आमच्यावर नजर ठेवून असतात. आमचे लोकेशन देण्यासाठी ठीकठिकाणी त्यांनी मुले नेमली आहेत. त्यामुळे कारवाई करण्यासाठी जाण्यापूर्वीच त्यांना माहिती पोहोचते. यापुढे पाळत ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच सांघिक पद्धतीने लोकेशन घेत असल्याने कारवाईदरम्यान पळून जाण्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. परंतु त्या विरोधात फिर्याद दाखल केली असून, यापुढेही अवैध वाळू माफियांवर धडक कारवाई केली जाईल.
ज्योती देवरे तहसीलदार पारनेर