नवी दिल्ली – टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी त्यांचे येथील सरकारी निवासस्थान रिकामे केले, असे त्यांच्या वकिलाने सांगितले. केंद्र सरकारच्या इस्टेट संचालनालयाने (डीओई) सकाळी मोईत्रा यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्यासाठी एक टीम पाठवली होती.
महुआ मोइत्राच्या ताब्यातील टेलीग्राफ लेनवरील घर क्रमांक ९ बी आज सकाळी १० वाजेपर्यंत अधिकारी येण्यापूर्वी रिकामे करण्यात आले होते असे मोइत्राचे वकील शादान फरासत यांनी पत्रकारांना सांगितले. त्या नंतर त्यांच्या घराचा ताबा डीओई अधिकार्यांना देण्यात आला आहे, असेही फरासात यांनी सांगितले.बंगला खाली करण्यासाठी मोईत्रा यांना नोटीस जारी करण्यात आली होती.
त्यांनंतर मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली होती पण त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नव्हता. त्यांची खासदारकी या आधीच रद्द करण्यात आली आहे.