मुंबई – गोपीचंद पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहमदनगर करमाळा महामार्गावरील पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या पडळकर यांनी मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हिडीओ बनवला आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मा.@PawarSpeaks यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या @RRPSpeaks यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे.मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये.@News18lokmat@abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi pic.twitter.com/299qq7RUpF
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2020
गोपीचंद पडळकर या व्हिडियोमध्ये म्हणाले,”पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीका कारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.’