सांगली – सांगलीच्या आटपाडीतील साठे चौकात आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच काही जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थीती नियंत्रणात आणली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी केला आहे.