Google ने Google Maps साठी नवीन अपडेट जारी केले आहे. काही दिवसांपूर्वीच नवीन एआय फीचर्स सादर करण्यात आले असून त्याशिवाय इंटरफेसमध्येही बदल करण्यात आले आहेत. गुगल मॅप्सचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे बनावट पुनरावलोकने (Fake content on google map) आणि दिशाभूल करणारी सामग्री. आता त्यांना सामोरे जाण्यासाठी गुगलने एक चांगले फिचर आणले आहे. (Google Map News Feature)
गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ते गुगल मॅप्सवर (Google maps update) शेअर केलेल्या सर्व कंटेंटचे निरीक्षण करत आहे. गुगलच्या मते, 1 स्टार रेटिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गुगलने म्हटले आहे की नवीन धोरणानुसार, कोणत्याही नवीन खात्याचे मोठ्या प्रमाणात पुनरावलोकन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अधिक नकारात्मक रिव्हिव असलेल्या खात्यांची छाननी केली जाईल. वापरकर्त्याने जाणूनबुजून खोटे रिव्हिव दिल्यास, त्याचे/तिचे योगदान मर्यादित असेल. याशिवाय जर कोणाला हानीकारक रिव्ह्यू किंवा कंटेंट पोस्ट केला जात असेल तर गुगल तेही थांबवेल. दिशाभूल करणारा मजकूर देखील हटविला जाईल. आवश्यक असल्यास, वापरकर्त्याचे मॅप्स खाते देखील ब्लॉक केले जाईल, त्यानंतर तो कोणतेही रिव्हिव देऊ शकणार नाही.
गेल्या महिन्यातच Google ने आपल्या Maps अॅपसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. गुगल मॅप्सच्या नवीन अपडेटमध्ये एआय सपोर्ट, इमर्सिव्ह व्ह्यू आणि बर्ड्स आय व्ह्यू यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय मॅप्समध्ये गुगल लेन्सचाही सपोर्ट आहे.
मॅप्सच्या Immersive View मुळे युजर्सनी चालताना, वाहन चालवताना किंवा सायकल चालवताना टप्प्या टप्प्यावर रस्ता सविस्तर पाहता येईल. हे नवीन वैशिष्ट्य सध्या अॅमस्टरडॅम, बार्सिलोना, डब्लिन, फ्लॉरेन्स, लास वेगास, लंडन, लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क, पॅरिस, सॅन फ्रान्सिस्को, सॅन जोस, सिएटल, टोकियो आणि व्हेनिस सारख्या शहरांमध्ये लाइव्ह आहे.