Flipkart UPI : तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टचे ग्राहक असाल आणि ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने आपल्या भारतीय ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आता आपली UPI सेवा भारतात सुरू केली आहे. याचा अर्थ आता तुम्ही इतर UPI पद्धतींप्रमाणेच ऑनलाइन पेमेंटसाठी फ्लिपकार्टचा वापर करू शकाल. | Flipkart UPI
Flipkart UPI सेवा सुरू केल्यानंतर, Google Pay, Paytm, PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. आता तुम्हाला कुठेही ऑनलाइन पेमेंट करायचे असल्यास, तुम्ही QR कोड स्कॅन करून फ्लिपकार्टद्वारे सहजपणे पेमेंट करू शकाल. Flipkart UPI च्या माध्यमातून तुम्ही बिल, मोबाईल रिचार्ज यांसारख्या अनेक गोष्टी करू शकता. | Flipkart UPI
Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी लाँच
भारतातील पेटीएम पेमेंट बँक अनेक समस्यांना तोंड देत असताना फ्लिपकार्टची UPI सेवा सुरू झाली आहे. पेटीएमच्या त्रासात फ्लिपकार्टच्या UPI सेवेचा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. UPI सेवा सुरू करण्यासाठी फ्लिपकार्टने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. फ्लिपकार्टने आपली UPI सेवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू केली आहे. | Flipkart UPI
जर तुम्हाला Flipkart UPI सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला Flipkart ची अपडेटेड आवृत्ती इंस्टॉल करावी लागेल. तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲप नसेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. सुरुवातीला Flipkart ग्राहकांना अकृषीत करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग व्यातिरिक्त काही खास ऑफर्सही देणार असल्याचं बोललं जात आहे.
असे वापरा Flipkart UPI
Flipkart UPI वापरण्यासाठी, प्रथम ॲप उघडा.
आता तुम्हाला होम पेजवर ‘Scan & Pay’ चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
पुढील स्टेपमध्ये तुम्हाला MY UPI च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव निवडण्यास सांगितले जाईल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा बँक तपशील भरावा लागेल.
तपशील भरल्यानंतर, तुमच्या नंबरवर एक ओटीपी कोड पाठवला जाईल, एकदा कोड टाकल्यानंतर, तुमचा Flipkart UPI सक्रिय होईल.