मुंबई – एवलीन शमाने तिच्या फॅन्सना एक गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे. स्वतः एवलीन शर्माने एका खासगी चॅनेलशी बोलताना ही माहिती दिली. “वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या गिफ्टची अपेक्षा केली होती.
त्यामध्ये हे सर्वात चांगले गिफ्ट आहे,’ असे तिने म्हटले आहे. आपल्या बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, असेही तिने सांगितले. एवलीनने 15 मे रोजी ऑस्ट्रलियातील सर्जन तुषान भिंडीबरोबर विवाह केला होता.
लग्नाचे सर्व विधी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात अगदी गुपचूप झाले होते. या दोघांचा साखरपुडा 2019 च्या ऑक्टोबरमध्येच झाला होता. एवलीन शर्माने यापूर्वी “ये जवानी है दिवानी’,
“यारियां’, “साहो’, “मै तेरा हिरो’ आणि “जब हॅरी मेट सेजल’सारख्या सिनेमांमधून काम केले आहे. बॉलीवूडमधील करिअर अगदी ऐन भरात असतानाच तिने अचानक गुपचूप लग्न करून चाहत्यांनी धक्का दिला होता.
तिने अजूनही पुढे ऍक्टिंग करिअर सुरू ठेवणार आहे की नाही, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र जर आता तिच्याकडे गुड न्यूज असेल तर तिच्या कमबॅकची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.