पुणे – गणेश भक्तांसाठी पुणे मेट्रोने (Pune Metro )खुशखबर दिली असून गणेशोत्सव काळात मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत तर विसर्जनाच्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav) पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या गणेशभक्तांना याचा मोठा लाभ होणार आहे.
पुणे मेट्रोने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. गणेशोत्सव हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री 2 पर्यंत चालू असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
असे असेल वेळापत्रक –
सध्या शहरात मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावते. तर 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधित मेट्रो सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत धावेल. तर 28 सप्टेंबर रोजी मेट्रो सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत धावेल.