लाहोर :- पाकिस्तान हॉकी महासंघाला आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने मोठा धक्का दिला आहे. पाक महासंघातील मनमानी कारभारामुळेच हा निर्णय घेतला गेल्याचे संघटनेने म्हटले आहे.
तब्बल 19 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यजमान पदासाठी सज्ज होत असलेल्या पाकिस्तान हॉकी संघटनेकडून विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या सामन्यांचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये याआधी 2004 साली चॅम्पियन्स करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. आता पात्रता सामन्यांसाठी पर्यायी देशाची लवकरच निवड केली जाणार आहे.
2024 साली जानेवारी महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या पात्रता फेरीचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले असून, अन्य दोन पात्रता फेरी चीन व स्पेन येथे होणार आहेत.