गुड न्युज..! ऐश्‍वर्या राय बच्चन होणार पुन्हा आई

पुणे – ऐश्‍वर्या राय बच्चनच्या ऍक्‍टिंग स्कीलपेक्षा तिच्या सौंदर्याचीच अधिक चर्चा होत असते; पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ऐश्‍वर्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. 

या फोटोंमध्ये तिच्याबरोबर अभिषेक बच्चन आणि मुलगी अराध्यादेखील दिसते आहे. काही दिवसांपूर्वी आर सरथ कुमार यांच्या घरी त्यांच्या फॅमिलीबरोबर ऐश्‍वर्याचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. हे फोटो बघून ऐश्‍वर्याकडे पुन्हा गुड न्यूज असल्याची शंका येऊ लागते आहे. 

या दोन्ही फोटोंमध्ये ऐश्‍वर्याचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसते आहे. एवढेच नव्हे तर ऐश्‍वर्याने दोन्ही फोटोंमध्ये आपले पोट झाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरूनच ऐश्‍वर्याकडे गुड न्यूज असल्याची शंका येते आहे. 

नेटकऱ्याकडून ही शंका उपस्थित केली जात असली तरी अद्याप बच्चन परिवाराकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. बऱ्याच काळापासून ऐश्‍वर्या मीडियापासून दूरच आहे.

त्यामुळे तिच्याबाबतचा कोणताच अपडेट मीडियाकडे नाही. अराध्या आता 9 वर्षांची झाली आहे. त्यामुळे दुसरी गुड न्यूज असण्याची शक्‍यता नाकारता येऊ शकणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.