नवी दिल्ली – भारतात केवळ क्रिकेटपटूच कुबेर बनतात हा समज गोल्फपटू अनिर्बन लाहिरीने खोटा ठरवला. त्याने अवघ्या सात दिवसांत तब्बल 16.7 कोटी रुपये कमावले.
तब्बन दोन महिने चालत असलेल्या आयपीएल स्पर्धेतून काही खेळाडू 16 ते 17 कोटींची कमाई करतात. मात्र, भारताचा स्टार गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने क्रिकेटपटूंनाही मागे टाकले आहे. लाहिरीने 7 दिवसात 2.17 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 16.7 कोटी रूपये कमावले आहेत. लाहिरी प्लेयर्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला असून विजेतेपदापासून केवळ एक शॉट लांब राहिला. मात्र, विजेतेपद जरी त्याने मिळवेल नसले तरीही कमाई मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी केली आहे.
अनिर्बनने 21 लाख 80 हजार डॉलरची आजवरच्या कारकिर्दितील सर्वात जास्त बक्षिस रक्कमही मिळवली आहे. एका आठवड्यात सर्वाधिक पैसे कमवणारा अनिर्बन पहिलाच भारतीय खेळाडू बनला आहे.
या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत राऊंडमध्ये 69 गुण मिळवणाऱ्या लाहिरीला सामना प्ले ऑफमध्ये नेण्यासाठी 18 व्या होल मध्ये बर्डीची गरज होती. मात्र तो अपयशी ठरला आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमरन स्मिथने विजेतेपद पटकावले.