सर्वांचे मनोरंजन करणारा, ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो आहे. तसेच, गेल्या १२ वर्षांपासून सलमान खानने ह्या शो चे होस्टिंग केले असून, शो यशस्वी करण्यात सलमान खानची महत्वाची भूमिका आहे. ‘बिग बॉस’चे वैशिष्टय़ म्हणजे हा रिएलिटी शो देशातील सर्वात मनोरंजक आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना एका छताखाली आणण्यासाठी ओळखला जातो. हा शो ‘बिग मनी गेम’ आहे यात शंका नाही.
तसेच, ब्रँड, स्पॉन्सरशिप, फिल्म प्रोमोशन यांसारख्या इतर अनेक माध्यमातून या शोची कमाई होते. अशातच, मीडिया तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी ‘बिग बॉस’ ओटीटीने 120 कोटींची कमाई केली. तसेच, १५० कोटींची कमाई जाहिरातीतून झाली. अशातच, शोची लोकप्रियता जसजशी वाढत चालली आहे, तसतशी या सीझनची कमाई १८० ते २०० कोटी इतकी होऊ शकते असा अंदाज लावला जात आहे.
देशभर टीव्ही माध्यमातून दीर्घकाळ राज्य केल्यानंतर, ‘बिग बॉस’ची कमाई प्रत्येक सीझनमध्ये वाढताना दिसली आहे. तसेच, ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये टीव्ही आणि ओटीटीवरील दर्शकांमध्ये अनुक्रमे ४१% आणि ४०% वाढ देखील पाहायला मिळाली आहे.
अशातच, ‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून सलमान खानची उपस्थिती केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यापुरती मर्यादित नाही, तर सुपरस्टार स्वतः एक ब्रँड व्हॅल्यू बाळगतो, ज्यामुळे अनेक ब्रँडचे लक्ष वेधले जाते. ‘बिग बॉस’ आज एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे जिथे प्रत्येक गोष्ट एकाधिक बनते, मग ते मनोरंजन असो किंवा पैसा. अशातच, प्रत्येक सीझनसोबत ‘बिग बॉस’मध्ये वाढ होताना दिसत असून त्यातील गुंतवणूकही वाढत आहे.
या शोचा चेहरा सलमान खान आहे आणि म्हणूनच ब्रँड्स शोमध्ये आर्थिक खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्रेझेंटिंग स्पॉन्सर्स, ‘पावर्ड बाय’ स्पॉन्सर्स, ‘ड्रिवेन बाय’ स्पॉन्सर्सपासून ट्रेंडिंग पार्टनरपर्यंत, या शोला मजबूत आर्थिक पाठबळ मिळाले आहे. ब्रँड, चित्रपटाच्या जाहिराती आणि जाहिरातदारांसाठी त्यांचा ब्रँड किंवा उत्पादन स्थापित करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रत्यक्षात एक आकर्षक शो आहे.