नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात सोमवारी सोन्याचा दर 62 रुपयांनी वाढून 47,262 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 195 रुपयांनी वाढून 68,122 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,786 डॉलर व चांदीचा दर 22.23 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक कंपनी तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमधील रिझर्व बॅंकांच्या धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.