सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे या दागिन्यांच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेऊया…
बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. गेल्या आठवड्यात सोन्याने 2,400 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळी घेतली होती. पण भारतीय बाजारात पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. पण याचा अर्थ मौल्यवान धातूंच्या किंमती 72 हजारांच्या खाली आल्या असा नाही. काय आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती?
मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोन्याने मोठी घौदौड केली. गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजारांनी महागले. तर त्यात 430 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात सोमवारी सोने 550 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी सर्वात मोठा दिलासा
चांदीने गेल्या आठवड्यात 1500 रुपयांची आघाडी उघडली खरी पण त्यानंतर सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत कोणतीच घडामोड दिसली नाही. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. होता. तर या आठवड्यात पहिल्याच दिवशी चांदीत 1 हजारांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.