Gold Silver Price : दिवाळीनंतर सहसा तुळशीच्या विवाहानंतर देशात लग्नाचा हंगाम सुरु होतो तसा आजपासून देशात हा हंगाम सुरु झाला आहे. दरम्यान, हा हंगाम सुरु होताच सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) मागणीत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, तुम्ही जर सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या…
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 61,000 च्या वर व्यवहार करत आहे. तर चांदी 73,000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. सध्या फ्युचर्स मार्केटमधील नवीनतम दर काय आहेत ते जाणून घेऊयात.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी,बाजारात सोने कालच्या तुलनेत 78 रुपयांच्या वाढीसह सध्या 61,150 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. काल सोन्याचा दर 61,072 रुपये होता. आज चांदीच्या दरात देखील किंचित वाढ झाली आहे.
चांदीच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढली आहे. सध्या ती 72,916 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 72,901 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. त्याचवेळी, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात 0.01 टक्क्यांची वाढ झाली आहे.