नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,३८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,३८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,७७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,१६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,३८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये २३ रुपयांचा फरक आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)