Money Laundering Case : जॅकलिन पाठोपाठ नोरा फतेही सुद्धा ईडीच्या रडारवर; ‘या’ दिवशी होणार चौकशी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ‘ईडी’ने चौकशी केली होती. तब्बल चार तास जॅकलिनची चौकशी करण्यात आली होती.

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने 200 कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याच प्रकरणी जॅकलिनची दिल्ली कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, आता याच प्रकरणी आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची चौकशी होणार आहे. ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीचा देखील जबाब नोंदवला होता.

याप्रकरणी नोराचीही पुन्हा ईडी चौकशी करणार आहे. या सर्व प्रकरणात नोराचे नाव पहिल्यांदाच समोर आले असून, एकच खळबळ उडाली आहे.

नक्की ‘सुकेश चंद्रशेखर’ आहेत तरी कोण?
23 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला होता, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (200 कोटी) वसूल केली होती.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ​​ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश यांच्या बंगल्यावर छापा टाकला, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये सांगितली गेली आहे.

छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे १५ आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.