Gold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या लेटेस्ट दर…

नवी दिल्ली -अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर इतर चलनांच्या तुलनेत डॉलर बळकट झाला. 

त्याचबरोबर सोन्यातील गुंतवणूक डॉलरकडे वळू लागली असल्यामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले.

दिल्ली सराफात सोन्याचा दर 861 रुपयांनी कमी होऊन 46,863 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,709 रुपयांनी कोसळून

68,798 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,810 डॉलर तर चांदीचा दर 26.89 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.