Gold Rates : सोन्याच्या दरात अल्प घसरण; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली  – जागतिक शेअर बाजार आणि इतर बाजारात अस्थिर वातावरण असल्यामुळे सोन्याचे दर अस्थिर आहेत. मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याच्या दरात केवळ तीन रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 45,258 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 40 रुपयांनी वाढून 58,750 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,761 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 22.42 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक चालू असून या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.