नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचा दर 35 रुपयांनी कमी होऊन 54,054 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 251 रुपयांनी कमी होऊन 65,928 रुपये प्रति किलो झाला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,772 डॉलर व चांदीचा दर 22.30 प्रति औंस या पातळीवर गेला होता.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेत व्याजदर वाढ होण्याच्या शक्यतेमुळे डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात कालपासून घट होत आहे.