नवी दिल्ली – सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 185 रुपयांनी वाढून सोन्याचे दर 54,678 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तयार चांदीच्या दरातही 1,672 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 66,742 रुपये प्रति किलो झाला.
रुपयाचे मूल्य आज वीस पैशांनी कोसळले. त्यामुळे डॉलर मोजून आयात होणाऱ्या सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,973 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 24.30 डॉलर या पातळीवर गेले.