जळोची- बारामती शहरातील सराफाच्या दुकानातून ३ लाख १० हजार रुपये किंमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर दिलीप देवकर (वय ३५ वर्ष ) यांनी फिर्याद दिली आहे.
सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी महिला व पुरुषाने आपसात संगनमत करून येथील सेल्समन सोन्याच्या बांगड्या दाखवत असताना त्याची नजर चुकवून वरील तीन अनोळखी आरोपींनी हातचलाखीने बारामती शहरातील ‘तनिष्क ज्वेलर्स’ या दुकानातून ४८.८४३ ग्रॅम वजनाच्या ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ४ बांगड्या चोरून नेल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे आहे. सदर घटनेचाा तपास सहाय्यक फौजदार खाडे करीत आहे.