मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने गोहे पाझर तलाव भरून वाहत आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने तलाव भरला आहे.
गोहे येथे तलाव असून गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने तलावातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, सांडव्यावरू पाणी वाहू लागल्याने नदीपात्रातही पाणी वाढले आहे.
हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरणाच्या) पायथ्याला घोडनदी पात्रात तलावाचे पाणी येऊन मिळते. घोडनदी पात्रात पाणी कमी झाले तरी सद्यःस्थितीत तलावातून अतिरिक्त पाण्यामुळे घोडनदीपात्रात पाणी वाढले आहे. यांचा फायदा 60 गावांना होत आहे.