पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरुवारी (दि. 13) दिवसभरात पुन्हा 946 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 662 वर पोहोचला. करोना बाधितांची संख्या 32 हजार 565 वर पोहोचली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील 922 जणांना तर शहराबाहेरील 24 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील 13 जणांचा समावेश आहे. आजच्या मृतांमध्ये 15 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर 36 ते 53 वयादरम्यानच्या 5 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 22 हजार 453 जण करोनामुक्त झाले आहेत, तर शहराबाहेरील 1 हजार 279 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात 448 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1237 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हा रुग्णालयात दोघांचा मृत्यू सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 13) उपचार सुरू असताना दोघा वृद्धांचा मृत्यू झाला. रुग्णालयात 12 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. मृत्यू झालेले ज्येष्ठ हे दापोडी आणि थेरगाव येथील रहिवाशी होत. त्यांचे वय अनुक्रमे 60 आणि 62 वर्ष इतके होते. रुग्णालयातून आज करोनामुक्त झालेल्या दोन पुरुष रुग्णांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 28 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.