‘तारक मेहता…’ मधील गोगीला मिळाली जिवे मारण्याची धमकी

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील गोगी म्हणजेच, “समय शहा’ला अज्ञात माणसाकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी बोरीवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समय शहाला धमकीचे फोन येत होते. त्यामुळे तारक मेहता मालिकेच्या सेटवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

27 ऑक्टोबर रोजी तो राहत असलेल्या बोरीवली येथील इमारतीच्या आवारात एक माणूस शिरला. त्याने आवारात उभ्या असलेल्या समय याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता त्याने समयला जिवे मारण्याची धमकी दिली. ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता असं त्याच्या आईने सांगितले.

समयची आई म्हणाली कि, ‘काही गुंड इमारतीच्या आवारात घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. याचा जाब विचारला असता गुंडांनी अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. समयसोबत ही तिसरी घटना घडल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. समयच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबतची तक्रार केली आहे. शुटींगवरुन परतल्यानंतर 8.30  च्या दरम्यान ही घटना घडली. समयने या संदर्भातील एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.