पुणे : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

पुणे – येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत असतानाच शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली. हडपसर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या आरोपींनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना मुलीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्याची सूचना दिली. तसेच या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यात आणखी कोणाचा समावेश आहे का? हे देखील तपासून पाहण्याची सूचना त्यांनी केली आहे.

तसेच कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने मुलीला मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी देखील सूचना गोऱ्हे यांनी केल्या आहेत. या घटनेबाबत नीलम गोऱ्हे गृहमंत्र्यांनादेखील पत्र देऊन शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना गस्तीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पहाण्याची परवानगी देण्याची सूचनादेखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.