मुंबई – हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेशबंदी केली. हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे.
“Beti bachao, beti padhao”, but if she is Muslim, “Beti Hatao”! Looks like that’s the agenda pic.twitter.com/6bQL8ZFuNx
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022
कर्नाटकमधील उडुपीप्रमाणेच कुंदापूर येथील एका महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच वर्गात येऊ अशी भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून १०० विद्यार्थ्यांनी भगवी शाल पांघरून महाविद्यालयात प्रवेश केला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कुंदापूरच्या स्थानिक नेत्यांनी हा वाद मिटविण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. यातच कर्नाटकात ‘हिजाब’वरून सुरू असलेल्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत.
कुंदापूर येथील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना रोखलं गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडियो शेअर करत या घटनेचा निषेध केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
“ तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेवबल फाटकी जीन्स घालणाऱ्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरूनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?” असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2022