नगर जिल्ह्यात मुलीच ठरल्या भारी !; बारावीचा निकाल 88.07 टक्के

मुलींचे प्रमाण 93.50टक्के,नगर शहर 89.06

नगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च -2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल आज (दि.28)दुपारी जाहिर झाला. त्यात नगर जिल्ह्याचा एकुण निकाल 88.07 टक्के इतका लागला. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याने जिल्ह्यात यंदाही मुलीच हुश्‍यार ठरल्या आहेत.
यंदाच्या बारावीच्या परिक्षेला नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे दोन्ही मिळून 64हजार 830 विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी केली होती. त्यापैकी 64हजार 780 विद्यार्थी परिक्षेसाठी उपस्थित राहिले. त्यातील 55 हजार 396 विद्यार्थी-विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. पैकी नियमित परीक्षार्थी पैकी 54 हजार902 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर पुनर्परीक्षार्थी पैकी2440 विद्यार्थ्या पैकी 494विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान -परिक्षेला बसलेले विद्यार्थी 31 हजार 645 पैकी 30हजार 451विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल 96.23 टक्के तर कला विभागात 20 हजार 307 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 036 विद्यार्थी उत्तीर्ण झाले कला विभागाचा निकाल 74.04 टक्के लागला. वाणिज्य विभागातून 9हजार 266 पैकी 8हजार 533 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा निकाल 92.09 टक्के लागला आहे तर व्यवसाय शिक्षण विभागात 1 हजार 122 पैकी 882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याविभागाचा निकाल 78.61 टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थीपैकी विज्ञान विभागात 360 विद्यार्थ्यापैकी 140 विद्यार्थी म्ह्णजेच 38.89 टक्के तर कला विभागात 1हजार 713 पैकी285 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. याविभागाचा 16.64 तक्के तर वाणिज्य विभागात 256 पैकी 60 विध्यार्थी उत्तीर्ण झाले याविभागाचा निकाल 23,44 टक्के लागला. तर व्यवसाय शिक्षण विभागात पुनर्परीक्षार्थी पैकी 111 पैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले याविभागाचा निकाल 8.11 तक्के इअत्का लागला आहे.

या वर्षी नियमित विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 522 विध्यार्त्थीनींपैकी 23 हजार 863विध्यार्थीनींनी परिक्षेत यश मिळविल्याने त्यांची टक्केवारी 93. 50 इतकी होवून या परिक्षेत मुकीच हुश्‍यार ठरल्या आहेत.तर विध्यार्थ्यात 36 हजार 818पैकी 31हजार 039 विध्यार्थी उत्तीर्ण झाल्याने त्यांची टक्केवारी 84.30 इतकी झाली आहे.


तालुका निहाय निकाल
अकोले-82.00,जामखेड-92.87,कर्जत -91.87,कोपरगाव -87.41,नगर -89.06,नेवासा-83.69,पारनेर-89.82,पाथर्डी-92.40,राहाता-87.29,राहुरी-83.84,संगमनेर-90.04,शेवगाव -92.15,श्रीगोंदा-90.03,श्रीरामपूर-76.74

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.