बी. व्ही. मांडे : श्री गणेश जयंतीनिमित्ताने आजपासून आयोजन
ओझर – श्री गणेश जयंतीनिमित्ताने श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे शनिवार (दि. 25) ते शनिवार (दि. 1 फेब्रुवारी) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी दिली.
या सप्ताह कालावधीत पहाटे 4 ते 7 काकडा, सकाळी 7 ते 7. 30 श्रींची आरती, 7.30 ते 8 पोथीवाचन, 8 ते 10 श्री गणेश पुराण पारायण, 10 ते 11 तुकाराम महाराजांचे गाथा भजन, दुपारी 3 ते 6 नियमाचे भजन, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन आणि 11 ते पहाटेपर्यंत हरिजागर असा दिनक्रम आहे.
या सप्ताहात शनिवार (दि. 25) हभप पुरुषोत्तममहाराज पाटील, रविवार (दि. 26) हभप माऊलीमहाराज पटाडे, सोमवार (दि. 27) हभप प्रकाशमहाराज साठे, मंगळवार (दि. 28) हभप गणेशमहाराज वाघमारे यांचे सकाळी 10 ते 12 गणेश जन्माचे कीर्तन आणि रात्री हभप सोपानमहाराज आढावणे, बुधवार (दि. 29) हभप सोपानशास्त्री सानप, गुरुवार (दि. 30) हभप प्रवीणमहाराज शेलार, शुक्रवार (दि. 31) हभप अक्रूरमहाराज साखरे आणि शनिवार (दि. 1) हभप महादेव महाराज राऊत यांचे हरिकीर्तन होणार आहे.