सोमाटणे, (वार्ताहर) – महाशिवरात्री उत्सवानिमित्त घोरावडेश्वर कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाची (ता.२) शनिवारी सुरुवात झाली. पुढील सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, गाथा पारायण, महिला भजन, हरिपाठ तर दुपारी दररोज दीड ते पाच वाजण्याच्या दरम्यान विविध गावातील भजनी मंडळांचे भजन, संध्याकाळी सात ते नऊ दरम्यान कीर्तन होणार आहे.
तीन महाराज काकडे, महादेव महाराज राऊत, चंद्रकांत महाराज वांजळे, ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, उमेश महाराज दशरथे, पंकज महाराज गावडे, उल्हास महाराज सूर्यवंशी व देवेंद्र महाराज निढाळकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. अशी माहिती घोरावडेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.