कामशेत, (वार्ताहर) – शिळीम खोरे एज्युकेशन सोसायटीचे स्मार्ट बिगिनींग प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व शाळेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आई – मुलांच्या नृत्याचे सादरीकरण वैशिष्ट्येपूर्ण ठरले.
कार्यक्रमास डॉ. अमर चौरे, अंजना मुथा, प्रा. चंद्रकांत ओव्हाळ, अध्यक्ष प्रफुल्ल ओव्हाळ, शिवानंद कांबळे, सुभाष भोते, चेतन वाघमारे, सचिन मोरे, आनंदा गायकवाड, वैशाली ओव्हाळ उपस्थित होते.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल ओव्हाळ यांनी अहवालाचे वाचन केले. तसेच वर्षभर झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धेचे व स्पोर्ट्स डेच्या विजत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शाळेने यावर्षी ९० च्या दशकाची थीम होती.त्यानुसार गाणी आणि वेश परिधान करून आलेले मुले आकर्षणाचा विषय ठरला.
तसचे आई व मुलांचे एकत्रित नृत्याचे सादरीकरण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका रुक्सर शेख, सोनम शहा, उज्ज्वला लालगुडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुमन जैस्वाल यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रतीक ओव्हाळ यांनी मानले.