फलटणमध्ये मतदान जनजागृतीसाठी घंटागाड्या

कोळकी -फलटणमध्ये मतदान जनजागृतीसाठी घंटागाड्यावरती ओडीओ क्‍लिप द्वारे मतदान जनजागृती मोहीम उपनिवडणूक शाखा फलटण व नगर परिषद फलटण यांच्यावतीने राबविली जात आहे. फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्यअधिकारी प्रसाद काटकर, नंदकुमार भोईटे नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, अनंत गवारे, सहा. गटविकास अधिकारी किशोर मानेतथा स्वीप पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनखाली मतदान जनजागृती मोहीम कार्यकम सुरू आहे.

या उपक्रमासाठी विनोद जाधव स्वच्छता निरीक्षक नगर परिषद फलटण व किरण उदमले सहाय्यक अधिकारी व सचिन जाधव स्वीप सहायक यांचे सहकार्य लाभत आहे. फलटण शहरातील एकूण नगर पालिका यांच्याकडे असणाऱ्या सर्व घंटागाड्यांवरती ओडीओ क्‍लिप द्वारे मतदान जनजागृती मोहीम राबविल्याने या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.