नवीदिल्ली – पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इम्रान खान यांच्याविरोधात मजेशीर घोषणाबाजी पाहायला मिळाली. इम्रान खान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना बाजूला जमलेल्या जमावाने घड्याळ चोर घड्याळ चोर अशी घोषणाबाजी केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर रोजी तोषखाना प्रकरणात इम्रान खान यांना ५ वर्षांसाठी अपात्र ठरवले होते. त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले. या निर्णयानंतर इम्रान पुढील ५ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. तोशाखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू जास्त भावात विकल्याचा आरोप इम्रानवर करण्यात आलाय.याविरोधात ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने केवळ निवडणूक लढविण्यापासून इम्रान यांना दिलासा दिला आहे. याचे पडसाद आता इम्रान खान यांच्या दौऱ्यांमध्ये उमटू लागल्याचे पाहायला मिळते.
People are chanting slogans against Imran khan “ Ghari Chor “. pic.twitter.com/k8ufLguTde
— Dr Mahwish Tabani (@MahwishTabani) October 27, 2022
इम्रान खान यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये इम्रान खान येताच अनेकजण त्यांच्याविरोधात ‘घडी चोर’ अशी घोषणाबाजी देताहेत. घोषणाबाजी देणारे वकील असलयाचे देखील समोर आले आहे.