पाकिस्तानमध्ये गरिबी इतकी वाढली आहे की, इथल्या इम्रान खान सरकारला गर्भनिरोधकांवरही कर लावावा लागला आहे. बुधवारी नॅशनल असेंब्लीमध्ये वित्त विधेयक 2021 अंतर्गत, इम्रान खान सरकारने 144 वस्तूंवर 17 टक्के दराने जीएसटी लागू केला. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला जेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी गर्भनिरोधकांवरही कर लावण्याची घोषणा केली त्यावेळी हा गोंधळ आणखीच वाढला.
यावेळी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिलावल म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान ही पाकिस्तानसाठी शतकातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. पुरवणी वित्त विधेयक 2021 अंतर्गत, इम्रान खान सरकारने गर्भनिरोधक देखील सोडले नाही. इम्रान खान सरकारने गर्भनिरोधक देखील सोडले नाही.
इम्रान खान यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती: बिलावल
बिलावल भुट्टो एवढ्यावरच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, गर्भनिरोधकांवरही कर लावण्यात आला आहे, इम्रान खान असा निर्णय घेईल, अशी अपेक्षा नव्हती. ही काही हसण्याची बाब नाही तुम्ही बांगलादेश आणि भारताकडे पहा जिथे लोकसंख्येचा स्फोट होत आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही लोकांच्या मूलभूत गरजा, त्यांचे खाणे-पिणे, रोजगार, त्यांचे आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी पुरवू शकत नाही, पण तुम्ही गर्भनिरोधकांवर कर लावणार आहात.