सर्दी मुळे होणारी डोकेदुखी चटकन थांबवा

सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्‍तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना आणि पावसाळ्याच्या दिवसांत अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो. सर्दी-पडसे विषाणूंमुळे किंवा काही वेळा ऍलर्जीमुळे होते. हे विषाणू एकापासून श्‍वासावाटे दुसऱ्याकडे सहज पसरतात. या विषाणूंविरुद्ध थोडीफार प्रतिकारशक्‍त तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्‍तीला पुनःपुन्हा सर्दी होऊ शकते.  (Home Remedies For Cough In Marathi)

सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो, त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतला भाग लाल व सुजलेला दिसतो. सुजेमुळे नाकाच्या आतली हवेची वाट अरुंद होते. श्‍वासाला त्रास होतो. या सुजेने नाकातून कानांत पोहोचणाऱ्या नळीचेही तोंड कधीकधी बंद होते. कानात विचित्र संवेदना होणे, कान गच्च होणे, दडे बसणे असा त्रास होतो. पहिल्या दोन-तीन दिवसांत नाकातले पाणी पांढरे आणि पातळ असते. नंतर ते घट्ट होत जाते. नंतर होणारा जंतुदोष (जिवाणू) हे या घट्टपणाचे कारण असते. सर्दी-पडशात बारीक ताप येतो. डोके जड होते व दुखते. डोळ्यातून सारखे पाणी येते. ऍलर्जीच्या सर्दीमध्ये खूप शिंका येतात. नाकातून पाणी गळते. नाक व डोळे यांना खाज येते.
सर्व साधारण पणे सर्दी एका आठवड्यात पूर्णपणे बरी होते.

उपचार – (Home Remedies For Cough In Marathi)

वातावरणबदलाच्या सामान्य सर्दीवर व डोकेदुखीवर विशेष उपचाराची गरज पडत नाही. ऍलर्जीच्या सर्दीची औषधे वेगळी असतात. अजून विषाणूंवर कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने विषाणूजन्य सर्दी बरी होण्यासाठी कसलेही विशेष औषध नाही. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणे हा एकच उपाय त्यासाठी आहे. कोणतेही औषध घेतले, तरी सर्दी बरी व्हायला आठवडा तरी लागतोच. सर्दीचा त्रास वारंवार होत असल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून अंतर्गत तपासणी करून घ्यावी. नाकाच्या अंतर्भागात पॉलिप (लहान द्राक्षघडासारखी वाढ) असल्यास वारंवार सर्दीचा त्रास होतो.

हा विकार सूक्ष्म दर्शकातून केलेल्या शस्त्रक्रियेने (एंडोस्कोपीक सर्जरी) पूर्ण बरा करता येतो. सर्दीपासून नंतर होणारे आजार – सर्दी दीर्घकाळ राहिल्यास नंतर आणखीही काही आजार निघू शकतात. ते म्हणजे कानदुखी, सायनस, घशाला सूज, श्‍वासनलिकादाह इत्यादी. सर्दी-पडशात विषाणूमुळे दाह असल्याने श्‍वसनमार्गाची प्रतिकारशक्‍ती थोडी कमी होते. त्यामुळे जंतुदोष होऊ शकतो. कान-नाक-घसा यांना जोडणाऱ्या नळीतून सर्दी-पडशाचे पाणी कधीकधी कानात ढकलले जाते. यामुळे मध्यकर्णाला सूज येते. यामुळे कान ठणकतो व नंतर कानाचा पडदा फुटू शकतो.(Home Remedies For Cough In Marathi)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.