मॅक्सिको – गरीब देशांना स्वस्त कर्ज देऊन त्यांना अडकवण्याची चीनची युक्ती जगाला काही नवी नाही. करोना काळातही चीनच्या क्लुप्त्या चालूच आहे. चीनने गरीब देशांना करोना लसीसाठी आमच्याकडून लोन घेऊन आमची करोना प्रतिबंधक लस घ्या, असे म्हंटले आहे. यासाठी ७०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन्स देशांचा समावेश केला आहे.
मॅक्सिको विदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्र्याने म्हंटले कि, आमच्या येथे तयार होणाऱ्या लसीचा वापर जगभरातील नागरिक करू शकतात. यासाठी त्यांच्या (चीन) कडून १ बिलियन डॉलरचे कर्ज दिले जाईल, असे सांगितले आहे. चीनच्या या प्रस्तावासाठी मॅक्सिकोच्या राष्ट्रपतींनी आभार व्यक्त केले आहेत. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान, चीनने अनेक वेळा गरीब देशांना स्वस्त कर्ज दिले आहे. एका माहितीच्या आधारे, आफ्रिकेचे ४० टक्के देश चीनच्या कर्जात बुडाले आहेत. या देशांवर चीनचे जवळपास १४० बिलियन डॉलरचे कर्ज आहे. चीनच्या सरकारने आणि तेथील कंपन्यांनी आतापर्यंत १५० देशांना कर्ज दिले असल्याची माहिती हार्वड बिजनेस दिली आहे.