मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे.
Can I get her details please. Wanna open a small training school with her where she can train women of our country some self defence techniques . https://t.co/Z8IJp1XaEV
— sonu sood (@SonuSood) July 24, 2020
या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. यातच पुन्हा एकदा सोनुने सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या आजींच्या व्हिडियोला शेअर करत या आजीची मदत करणार असल्याचे सांगितले आहे.
सोनुने ट्विट केले आहे की,’एक आजी आपले पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठी खेळताना दिसत आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत. त्यांचा बरोबर मी एक लहान प्रशिक्षण शाळा उघडेल जिथे ती आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षणाचे तंत्र प्रशिक्षण देऊ शकेल.’ असं म्हणत सोनुने येत्या काळात प्रशिक्षण सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. असं ट्विट करत पोटासाठी रस्त्यावर ‘कसरत’ करणाऱ्या ‘वॉरिअर आजी’ च्या मदतीला सोनू सूद धावला आहे.