मुंबई – अभिनेता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. जिनिलीयाने नुकतेच तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती हटके लुकमध्ये दिसत आहे. जिनिलीयाने काळ्या रंगाच्या डिपनेक ब्लेझर परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय तिने गळ्यात ‘मॉं’ शब्दाच्या लॉकेटची चेन घातली आहे. तिच्या या लॉकेटकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. सध्या तिच्या या फोटोला ‘देशमुख वहिनीसाहेब एकदम छान’, ‘‘मॉं’ लॉकेट खूप छान,’ अशा कमेंट नेटकरी करत आहे.
https://www.instagram.com/p/CtbAgFoo53Q/
दरम्यान, रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सर्वांनाच वेड लावले आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. रितेश-जिनेलिया ही खऱ्या आयुष्यातील जोडी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 70 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.