मुंबई – अमृता सिंग 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला ती तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रेमात दोनदा अपयश आल्यानंतर अमृता सिंगने अभिनेता सैफअली खान बरोबर लग्न केले तेव्हा सैफ बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होता. अवघ्या तीन महिन्यांच्या डेटिंगमध्ये अमृताने 20 वर्षीय सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हे लग्न पतौडी कुटुंबातील मुलाचे असल्याने त्यावेळी अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नाला कपूर कुटुंबानेही हजेरी लावली होती.
सैफ आणि अमृताच्या लग्नात करीनाही पाहुणी म्हणून पोहोचली होती आणि लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असा दावा केला जात आहे की, सैफला त्याच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देताना करीना ‘मुबारक हो सैफ अंकल’ अशी म्हणाली होती. तेव्हा सैफही हसत म्हणाला होता ‘धन्यवाद बेटा’. मात्र, काळाने असे वळण घेतले की करीना आणि सैफच एकमेकांच्या प्रेमात पडले. आज करीना ही सैफची बायको आहे.
अमृता आणि सैफचे नाते बऱ्याच कटुतेनंतर संपले. 2004 मध्ये पैशावरून भांडण आणि सैफच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांचा घटस्फोट झाला. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने स्विस मॉडेल रोजा कॅटालानोला 3 वर्षे डेट केले होते. नंतर त्यांचाही ब्रेकअप झाला होता.
काही वर्षांनी सैफ अली खान आणि करीना कपूर खान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटले आणि कामासोबतच दोघांमधील जवळीक वाढत गेली. दोघांनी 5 वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 2012 मध्ये लग्न केले. सैफ अली खानला चार मुले आहेत. पहिली पत्नी अमृता सिंगकडून दोन आणि करीना कपूर खानकडून दोन.सैफची मुलगी सारा अली खान ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.