नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नेहमीच कोविडचे सावट होते आता नवीन 2023 वर्ष उद्यापासून सुरू होत असले जरी जगाच्या इतर भागांमध्ये कोविडचे सावट असले तरी त्याची तीव्रता भारतात दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर 2023 मध्ये राजकीय गोटात काय दडले आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 2023 हे वर्ष विधानसभा निवडणुकांनी गाजणार आहे तसेच अनेक बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर महत्त्वाच्या वेब सिरीज प्रदर्शित होणार असून काही चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2023 या वर्षात विविध कालावधीमध्ये देशातील 9 विधानसभांच्या मुदती संपत असून या सर्व विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. ईशान्य भारतातील मेघालय मिझोराम त्रिपुरा नागालँड आणि छत्तीसगड या छोट्या राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. याशिवाय राजस्थान कर्नाटक मध्यप्रदेश तेलंगणा या महत्वाच्या राज्यांची विधानसभा निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. जर केंद्र सरकारने निर्णय घेतला तर जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक होऊ शकते. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या विधानसभा निवडणुका असल्याने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
महाराष्ट्राचा विचार करता 2023 च्या पूर्वार्धामध्ये मुंबईसह अनेक महापालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे याशिवाय नगरपालिकांच्याही निवडणुका घेतल्या जातील नागरी मतदारांचा कौल काय आहे हे कळणार आहे. एकीकडे निवडणुकांचे वारे वाहणार असतानाच दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत त्यामधील काही वेब सिरीज लोकप्रिय झाल्या आहेत त्याच्या पुढील भागांची प्रतीक्षा 2023 मध्ये प्रेक्षकांना आहे त्यापैकी मिर्झापुर या वेब सिरीजचा तिसरा भाग फॅमिली मॅन या सिरीजचाही तिसरा भाग आणि असुर या वेब सिरीजचा दुसरा भाग पहिल्या काही दिवसांमध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हर्षद मेहताच्या घोटाळ्यावर ज्या प्रकारे स्कॅम 92 ही वेब सिरीज सोनी लाईव्हवर प्रदर्शित झाली होती त्या सोनी लाईव्हवर आता अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर आधारित स्कॅम 2002 ही वेब सिरीज यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटांचे महत्त्व जरी कमी केले असले तरी आगामी वर्षांमध्ये शाहरुख खानचा पठाण आणि काही चित्रपटांबाबत प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे मराठी चित्रपट सृष्टीचा विचार करता व्हिक्टोरिया एक रहस्य, वाळवी या चित्रपटाबरोबरच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे प्रदर्शन 2023 मध्ये होणार आहे. क्रीडाक्षेत्राचा विचार करता वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये होणारा 50 षटकांची विश्वचषक स्पर्धा हे क्रीडा चाहत्यांसाठी सर्वात महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे