मुंबई – सध्या सर्वत्र दिवाळीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. ठीक ठिकाणी दिवाळीनिमित्त (Diwali 2023) विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. ठाण्यातील अशाच एका कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे एक बॅनर देखील जोरदार व्हायरल होतंय. कारणही तसच आहे, या बॅनरवर थेट गौतमी पाटील (Gautami Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोटो असल्याचे पाहायला मिळते.
गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची संपूर्ण राज्यभर सतत चर्चा असते.दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. आता गौतमी पाटील ठाण्यातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असलयाचे समजते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावर अधिकृत टिक असलेल्या गौतमी पाटीलच्या अकाउंटवरून याबाबतच एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. (Gautami Patil Eknath shinde poster)
‘लवकरच ठाण्यात’ असं गौतमीच्या स्टोरीतील पोस्टमध्ये लिहिलं आहे.गौतमीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्यासह मुख्यमंत्री शिंदे आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा देखील फोटो आहे. गौतमीचा कार्यक्रम लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच म्हणजे रविवारी (12 नोव्हेंबर) होणार आहे. (Gautami Patil Viral video)
कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. कधी तिच्या नृत्य करण्याच्या शैलीमुळे गौतमीवर टीकाही केली जाते तसेच, तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून होत असते. अशात गौतमी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात येऊन कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.