इस्लामपूर – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, यावेळी त्यांचे चुलते, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी हे अनुपस्थित होते.
त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून गौरव नायकवडी यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. गौरव नायकवडी यांना अनपेक्षितरित्या इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव शिंदे उपस्थित होते.