बांदा- उत्तर प्रदेशात एका बारा वर्षांच्या गतीमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री बांदा जिल्ह्यात घडला. सदर मुलगी तेथे एका विवाह समारंभासाठी आली होती.
गुरुवारी रात्री ती अचानक बेपत्ता झाली. तिची सर्वत्र शोधाशोध केली, पण ती सापडू शकली नव्हती. शुक्रवारी रात्री ती बेशुद्धावस्थेत सापडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
दोन अज्ञात इसमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. नेमक्या किती लोकांनी हे दुष्कृत्य केले याची अजून माहिती मिळालेली नाही. हे कृत्य करणारे आरोपी फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.