पुणे : शहरात गेली दहा दिवस संपूर्ण भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज (दि. 28) निरोप देण्यात येणार आहे.
सकाळी 10:00 वाजल्यापासून शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार असून सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व मंडळे आणि महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी या मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा बारीक लक्ष असणार आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून मिरवणुकीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यात आज ९ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
प्रमुख मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्हीचा ‘वॉच’असणार आहे. पोलीस आयुक्तालय आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.