पुणे : शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या शिवसेना भवनात आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करीत समस्त शिवसैनिकांच्या हस्ते भक्तीभावाने आणि आनंदाची उधळण करीत गणरायाचे आगमन झाले, यावेळी मंत्रोपचाराचा आणि गणरायाचा गजर करीत शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
अतिशय मोहक अशा सजावटीत बाप्पांना विराजमान करण्यात आले, यावेळी शहरातील सर्वच भागातून उपस्थित असलेले शिवसैनिक पदाधिकारी तसेच उपशहर प्रमुखांच्या हस्ते यावेळी श्रींची पूजा करण्यात आली,संपूर्ण पुण्यात गणरायाच्या या आगमनाची उत्साहाने आणि आनंदाने उधळण सुरू असताना शिवसेना भवनातही तितक्याच जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
“हिंदू धर्माच्या सण परंपरा महायुती सरकार आल्यानंतर अजून मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहेत. याचेच प्रतीक म्हणजे शिवसेना भवनात आज साक्षात गणपती बाप्पा विराजमान झालेत हे सरकार असंच कायम राहू दे आणि सामान्य जनतेला न्याय हक्कासाठी लढण्यासाठी बळ मिळू दे ही प्रार्थना गणरायाकडे केली,” असे शहर प्रमुख भानगिरे म्हणाले.
यावेळी सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले युवासेना राज्य सचिव किरण साळी, युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्कप्रमुख अविनाश खेडेकर, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,सुनील जाधव, सचिन थोरात, महिला आघाडी उपशहरप्रमुख श्रुती नाझीरकर समन्वयक नवनाथ निवगुणे शहर संघटक प्रमोद प्रभुणे, शहर प्रवक्ते, अभिजीत बोराटे, युवासेना शहर संघटक गणेश काची, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.