राहाता – येथील साईयोग फाउंडेशन द्वारे राहाता तालुका परीट धोबी समाज, लायन्स क्लब सह्याद्री व लायन्स क्लब राहाताच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. साईयोग फाउंडेशन गेली नऊ वर्षापासून प्रत्येक रविवार स्वच्छता अभियान अथवा वृक्षरोपन वृक्षसंवर्धन मोहीम राबवत आहे. त्यामुळे राहाता शहराच्या स्वच्छता व सौंदर्यात भरच पडत आहे.
राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व डॉ.पांडुरंग गुंजाळ यांच्याहस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सुरुवातीला परीट धोबी समाजाचे नेते व लायन्स क्लब सह्याद्रीचे अध्यक्ष राजेंद्र फंड यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी डॉ पी.जी.गुंजाळ, राजूभाई पठाण, राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय धनवटे, विनोद गाडेकर, दीपक दंडवते, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, मोहन तांबे, संजय बाबर, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, नामदेव गवते, विजय बनकर, विठ्ठल तांबे, बबन आजबे, केतन कुंभकर्ण, प्रकाश निधाने, गजेंद्र कोळपकर, दिनेश जगदाळे, अनिल देसाई, जागृती देसाई, संजय रंधे, व्यंकटेश अहिरे ,मनोज पिपाडा, पांडुरंग गायकवाड, बबनराव लुटे, सिताराम बावके, आण्णासाहेब कांदळकर ,प्रकाश बेंद्रे आदी उपस्थित होते.गोपाळा गोपाळा, देवकीनंदन गोपालाच्या भजनाने समारोप करण्यात आला.