मुंबई – अभिनेता सनी देओल (sunny deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (ameesha patel) स्टारर चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तब्बल 22 वर्षांनंतर या सिक्वलमध्ये दिसलेल्या तारा सिंहची दमदार अॅक्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.
यासोबतच या ‘गदर 2’ने (Gadar 2)आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात येणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत तब्बल 300 कोटींचा गल्ला जमावला असून, या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
2023 च्या सर्वात हिट चित्रपटांच्या यादीत गदर 2 (Gadar 2) चा समावेश करण्यात आला आहे. आता लवकरच ‘गदर 2’ OTT वर धडकणार आहे. गदर 2 चे चाहते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या OTT रिलीजची वाट पाहत आहेत.
दरम्यान, निर्मात्यांनी असेही सांगितले होते की गदर 2 च्या ओटीटी रिलीजला बराच वेळ लागेल. कारण चित्रपट सतत थिएटरमध्ये चालू आहे. आता गदर 2 च्या ओटीटी रिलीजबाबत एक अपडेट आले आहे.
हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. OTT Play नुसार, गदर 2 ZEE5 वर स्ट्रीम केला जाईल. गदर 2 काही आठवड्यांनंतर 6 ऑक्टोबर 2023 रोजी ZEE5 वर पाहायला मिळू शकेल.